livelawmarathi

"तिनं खून केलाय का?" – पूजा खेडकरची सर्वोच्च न्यायालयात नाट्यमय सुनावणी

"तिनं खून केलाय का?" –  पूजा खेडकरची सर्वोच्च न्यायालयात नाट्यमय सुनावणी

"तिनं खून केलाय का?"–  पूजा खेडकरची सर्वोच्च न्यायालयात नाट्यमय सुनावणी...

    सर्वोच्च न्यायालयाने बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिला अटकपूर्व जामीन मंजूर केला. खेडकर यांच्यावर आरोप आहे की त्यांनी 2022 च्या UPSC सिव्हिल सेवा परीक्षेत ओबीसी व दिव्यांग कोट्याअंतर्गत आरक्षणाचा फायदा मिळवण्यासाठी फसवणूक व चुकीचे प्रतिनिधित्व केलं.

न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना व सत्येंद्र चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर यांनी सुरू असलेल्या चौकशीत पूर्ण सहकार्य करावं, असे निर्देश दिले. या प्रकरणाच्या स्वरूपावर तोंडी निरीक्षण करताना न्यायालयाने आरोपांच्या तीव्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 

न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या, “तिनं असा कोणता गंभीर गुन्हा केला आहे? ती काही ड्रग माफिया किंवा अतिरेकी नाही. तिनं 302 (खून) केला नाही. ती NDPS कायद्यानुसार गुन्हेगार नाही. चौकशी पूर्ण करा. तिनं सगळं गमावलं आहे आणि तिला आता कुठेही नोकरी मिळणार नाही.”

खंडपीठाने पुढे नमूद केलं की, “ही बाब पाहता दिल्ली उच्च न्यायालयाने तिला जामीन द्यायला हवा होता.”

    मात्र दिल्ली पोलिसांनी या निर्णयाला विरोध करत सांगितले की, खेडकर चौकशीला सहकार्य करत नाहीये आणि तिच्यावरचे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. खेडकर यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी आपली सामाजिक व शारीरिक ओळख चुकीची दाखवून UPSC परीक्षेत ओबीसी व दिव्यांग कोट्यांमधून मिळणाऱ्या आरक्षणाचा व परीक्षा संधींचा फायदा घेतला. अधिकाऱ्यांच्या मते, त्यांनी ही माहिती खोट्या पद्धतीने सादर केली.

    कर्मचारी निवड आयोग (UPSC) कडून तिच्यावर शिस्तभंगात्मक कारवाई करण्यात आली असून, तिच्याविरुद्ध फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनीही तिच्याविरुद्ध विविध कलमानुसार FIR दाखल केला आहे. खेडकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले असून, त्यांनी कोणतीही फसवणूक केल्याचं नाकारलं आहे.

Share this post with your friends

Back Next
No one has commented on this post yet.
Lock after commenting

टॉक लाईव्हलॉ मराठी वेबसाइट Live Law Marathi Mind Communicating Port Comments are reviewed

comment url