livelawmarathi

सासऱ्याच्या संपत्तीतून विधवा सुनबाईला पोषणाचा हक्क: दिल्ली उच्च न्यायालय

सासऱ्याच्या संपत्तीतून विधवा सुनबाईला पोषणाचा हक्क: दिल्ली उच्च न्यायालय

सासऱ्याच्या संपत्तीतून विधवा सुनबाईला पोषणाचा हक्क: दिल्ली उच्च न्यायालय

    दिल्ली उच्च न्यायालयाने ठरवले आहे की, विधवा झालेल्या सुनबाईस तिच्या सासऱ्याच्या मृत्यूनंतर देखील, त्यांच्या कौटुंबिक (सह-हक्काच्या) संपत्तीतून म्हणजेच कॉपार्सनरी संपत्तीतील वाट्यातून पोषणासाठी रक्कम (maintenance) मागण्याचा कायदेशीर अधिकार आहे, जरी सासऱ्याचे निधन तिच्या पतीच्या निधनापूर्वी झालेले असले तरी.

    न्यायमूर्ती अनिल खेतरपाल आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने कौटुंबिक न्यायालयाचा निकाल बाजूला सारत असे ठरवले की, हा दावा एक कायद्यान्वय असलेला अधिकार आहे आणि सासऱ्याच्या मृत्यूनंतर देखील त्याच्या संपत्तीवर असा दावा करता येतो.

केसचा पार्श्वभूमी:

    ही याचिका एका विधवा झालेल्या सुनबाईने दाखल केली होती, ज्यामध्ये दक्षिण-पश्चिम जिल्हा, साकेत येथील कौटुंबिक न्यायालयाच्या 27 ऑगस्ट 2024 रोजी दिलेल्या निर्णयाविरोधात अपील करण्यात आले होते. अपीलकर्ता सुनबाईच्या पतीचे निधन 2 मार्च 2023 रोजी झाले होते, तर तिच्या सासऱ्याचे निधन 27 डिसेंबर 2021 रोजी झाले होते. तिने हिंदू दत्तक व पोषण अधिनियम, 1956 (HAMA) च्या कलम 19, 21, 22 व 23 अंतर्गत पोषणासाठी याचिका दाखल केली होती. कौटुंबिक न्यायालयाने ही याचिका कलम 22 अंतर्गत ग्राह्य धरता येणार नाही असे म्हणत फेटाळली. याविरोधात तिने उच्च न्यायालयात अपील केले.

प्रमुख कायदेशीर मुद्दा असा होता की:

"एका सुनबाईस, जि सासऱ्याच्या मृत्यूनंतर विधवा झाली आहे, सासऱ्याच्या संपत्तीतील हिस्सा (coparcenary property) वापरून पोषणासाठी दावा करता येईल का?"

न्यायालयाचे विश्लेषण आणि HAMA चे कलमवार स्पष्टीकरण:

कलम 19 – सासऱ्याकडून विधवा सुनबाईस पोषण-

न्यायालयाने नमूद केले की कलम 19(1) नुसार, विधवा सुनबाईस सासऱ्याकडून पोषण मागण्याचा कायद्यान्वय अधिकार आहे.
मात्र कलम 19(2) नुसार, हा अधिकार फक्त सासऱ्याच्या कॉपार्सनरी संपत्तीपुरताच मर्यादित आहे. सासऱ्याची स्वतःची संपत्ती (self-acquired) असल्यास, सुनबाईस पोषणाचा दावा करता येणार नाही. त्यामुळे हा वैयक्तिक (personal) दायित्व नसून संपत्तीशी संबंधित (estate-linked) आहे.

कलम 21 व 22 – “आश्रित व्यक्ती” या नात्याने सुनबाईचा अधिकार-

कलम 21(vii) मध्ये "मुलाच्या विधवा पत्नीस" आश्रित म्हणून मान्यता आहे. त्यामुळे, जर विधवा सुनबाई स्वतःच्या किंवा पतीच्या संपत्तीतून स्वतःला पोसू शकत नसेल, तर ती सासऱ्याच्या संपत्तीवरून पोषणासाठी दावा करू शकते.

कलम 22 नुसार, मृत हिंदूच्या वारसदारांनी त्यांच्या वारसाहक्कातून मिळालेल्या संपत्तीतून अशा आश्रितांचा भरणपोषण करणे बंधनकारक आहे.

कलम 28 – हस्तांतरणावरील प्रभाव-

कलम 28 नुसार, जर संपत्तीचे हस्तांतरण कोणत्याही व्यक्तीस मोफत केले गेले असेल किंवा त्या व्यक्तीस विधवा सुनबाईच्या पोषणाच्या हक्काची माहिती होती, तर ती व्यक्ती देखील सुनबाईच्या पोषणाच्या दाव्यास उत्तरदायी असेल. यामुळे, हक्क टाळण्यासाठी संपत्तीचे हस्तांतरण करून विधवा सुनबाईचा अधिकार बुडवता येत नाही.

कायदेविषयक धोरण आणि सामाजिक कल्याणाचा दृष्टिकोन:

    न्यायालयाने हिंदू दत्तक व पोषण अधिनियम, 1956 (HAMA) हा कायदा एक सामाजिक कल्याणकारी कायदा म्हणून मान्य केला, जो अशा असहाय्य स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी बनवलेला आहे.
त्यामुळे, कलम 19(1) मधील शब्दरचना अरुंदपणे न पाहता, त्याचा अर्थ विस्तृतपणे घेतला पाहिजे, जेणेकरून विधवा सुनबाई न्यायहक्कापासून वंचित राहू नये.

अंतिम निर्णय:

    न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवत सुनबाईची याचिका कायदेशीररीत्या ग्राह्य आहे, असे ठरवले. तिच्या वकिलांनी तात्पुरत्या पोषणासाठी (interim maintenance) मागणी केली होती, परंतु उच्च न्यायालयाने तशी कोणतीही आदेश न देता, कौटुंबिक न्यायालयास जलद निर्णय देण्याचे निर्देश दिले. पक्षकारांना दिनांक 9 सप्टेंबर 2025 रोजी कौटुंबिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. यासह अपील निकाली काढण्यात आले.



Share this post with your friends

Next
No one has commented on this post yet.
Lock after commenting

टॉक लाईव्हलॉ मराठी वेबसाइट Live Law Marathi Mind Communicating Port Comments are reviewed

comment url