सरन्यायाधीश भुषण गवई यांचा महत्वपूर्ण निर्णय..
सरन्यायाधीश भुषण गवई यांचा महत्वपूर्ण निर्णय..
भारताचे सरन्यायाधीश भुषण रामकृष्ण गवई हे २६ मे २०२५ पासून सुरु होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या उन्हाळी सुटीनदरम्यान खंडपीठाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. हा निर्णय अत्यंत दुर्मिळ मानला जात असून न्यायालयाच्या तातडीच्या आणि महत्त्वाच्या प्रकरणांप्रती असलेल्या तत्परतेचा तो पुरावा आहे.
सर्वोच्च न्यायालय नियमावली, २०१३ मधील अध्यादेश II, नियम ४ नुसार प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेनुसार, न्यायालय उन्हाळी सुटीनंतर काही ठराविक दिवशी कार्यरत राहणार आहे. ही सुटी २६ मे ते १३ जुलै २०२५ दरम्यान राहणार असून नियमित सुनावण्या १४ जुलै, सोमवारपासून पुन्हा सुरु होतील.
या कालावधीत, २६ मे ते १ जून दरम्यान सर न्यायाधीश गवई हे न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या सोबत खंडपीठावर बसणार आहेत. सामान्यतः सरन्यायाधीश सुटीच्या काळात खंडपीठावर बसत नाहीत, व ही जबाबदारी वरिष्ठ न्यायमूर्तींवर सोपविली जाते. त्यामुळे, सध्याचे सरन्यायाधीश खंडपीठावर बसणार असल्यामुळे न्यायालय तातडीच्या आणि गरजेच्या प्रकरणांना किती प्राधान्य देत आहे, हे अधोरेखित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने (नोंदणी विभाग), रजिस्ट्रार टी. आय. राजपूत यांच्या हस्ते संपूर्ण उन्हाळी खंडपीठांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे खंडपीठ नियम ६, अध्यादेश II नुसार तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी घेणार आहे.
उन्हाळी खंडपीठांची ठळक वैशिष्ट्ये:
-
पहिला आठवडा (२६ मे – १ जून): सरन्यायाधीश गवई व न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह
-
पुढील आठवडे: न्यायमूर्ती सूर्यकांत, संजय करोल, प्रशांत कुमार मिश्रा, उज्ज्वल भुयान, के. व्ही. विश्वनाथन, एम. एम. सुंदरेश, सुधांशु धुलिया व इतर मान्यवर न्यायमूर्तींच्या खंडपीठांमार्फत सुनावण्या घेतल्या जातील.
सर्वोच्च न्यायालयाची नोंदणी शाखा उन्हाळी सुटीच्या कालावधीत सकाळी १०:०० ते सायं. ५:०० या वेळेत अधिकाऱ्यांसाठी व सकाळी ९:३० ते सायं. ५:३० या वेळेत गट-क (गैरकार्यालयीन) कर्मचाऱ्यांसाठी खुली राहील. सर्व शनिवार (१२ जुलै वगळता), रविवार व राजपत्रित सुट्यांनिमित्त कार्यालय बंद राहील.सर न्यायाधीश गवई यांचा न्यायालयात स्वतः उपस्थित राहण्याचा निर्णय हा संस्थात्मक जागरूकतेचे आणि न्यायसंस्थेच्या तात्काळ प्रतिसादक्षमतेचे दर्शन घडवतो.
टॉक लाईव्हलॉ मराठी वेबसाइट Live Law Marathi Mind Communicating Port Comments are reviewed
comment url