livelawmarathi

सरन्यायाधीश गवई यांची शाळेला भेट; मातृभाषेच्या शिक्षणामुळेच यश मिळाल्याचे सांगितले

सरन्यायाधीश गवई यांची शाळेला भेट; मातृभाषेच्या शिक्षणामुळेच यश मिळाल्याचे सांगितले


सरन्यायाधीश गवई यांची शाळेला भेट; मातृभाषेच्या शिक्षणामुळेच यश मिळाल्याचे सांगितले

    भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी मुंबईतील त्यांचे  चिकीत्सक समूह शिरोडकर शाळेला भावनिक भेट दिली. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मराठी माध्यमातून घेतलेल्या शिक्षणाला दिले आणि सांगितले की, त्यांच्या मूल्यांची आणि यशाची पायाभरणी मातृभाषेतील शिक्षणामुळे झाली.

    या भेटीदरम्यान सरन्यायाधीश गवई यांनी आपल्या जुन्या वर्गमित्रांशी संवाद साधला आणि त्यांच्या आयुष्याची घडण घडवणाऱ्या शिक्षकांप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “आज मी ज्या स्थानापर्यंत पोहोचलो आहे, त्यामागे या शाळेचा आणि माझ्या शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे.”

    आपल्या शालेय जीवनावर प्रकाश टाकताना सरन्यायाधीशांनी सांगितले की, मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे संकल्पनांची सखोल समज होते आणि आयुष्यभर टिकणाऱ्या मूल्यांची रुजवात होते. “माझ्या सार्वजनिक वक्तृत्वाच्या प्रवासाची सुरुवात इथल्याच या स्टेजवरून झाली,” असे त्यांनी आठवणीत म्हणत सांगितले. शाळेत घेतलेल्या भाषण स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे आत्मविश्वास निर्माण झाला, असेही त्यांनी नमूद केले.

    शाळेतील वर्गखोल्या, ग्रंथालय आणि कला विभागाला भेट देत त्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. सध्याच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या स्नेहपूर्ण सन्मानाने ते भारावून गेले आणि अधिकृत निवेदनानुसार ही भेट त्यांच्या साठी अभिमानास्पद आणि भावनिक ठरली.


Share this post with your friends

Back Next
No one has commented on this post yet.
Lock after commenting

टॉक लाईव्हलॉ मराठी वेबसाइट Live Law Marathi Mind Communicating Port Comments are reviewed

comment url