"आदिपुरुष" चित्रपटाने राम आणि रामायणाची खिल्ली उडवली - उच्च न्यायालयात धाव
"आदिपुरुष" चित्रपटाने राम आणि रामायणाची खिल्ली उडवली - उच्च न्यायालयात धाव
आदिपुरुष चित्रपटाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली असून, चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे.हिंदू सेनेने या याचिकेत निर्मात्यांनी रामायण, भगवान राम आणि हिंदू संस्कृतीची थट्टा केल्याचा आरोप केला आहे. प्रभास आणि कीर्ती सेनॉनचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट शुक्रवारी १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होताच तो कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.
नेमके काय आरोप आहेत?
दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत या चित्रपटात रामायण, भगवान श्रीराम आणि भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्याशिवाय, हिंदू सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी दिल्ली न्यायालयाला ‘आदिपुरुष’ मधील रावण (सैफ आली खान), भगवान राम(प्रभास), माता सीता (कीर्ती सेनॉन) आणि हनुमान(देवदत्त नागे) यांचा समावेश असलेली कथित आक्षेपार्ह दृश्ये हटवण्याची मागणी केली आहे. ही दृश्ये रामायणातील धार्मिक पात्रांच्या चित्रणाशी विपरित असल्याचा दावा केला आहे.
वादाचे इतरही असंख्य मुद्दे आहेत, याचिकेत रावणाच्या दाढी असलेल्या व्यक्तिरेखेवरही टीका करण्यात आली आहे. या चित्रणामुळे हिंदू नाराज झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याचिकेत म्हटले आहे की, “हिंदू ब्राह्मण रावणाला चुकीच्या पद्धतीने भयानक चेहरा दाखवण्यात आला आहे, हा हिंदू संस्कृतीचा घोर अपमान आहे.” तसेच चित्रपटातील रावणाबद्दलच्या दृश्य तथ्यांचा पूर्णपणे विपर्यास करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
टॉक लाईव्हलॉ मराठी वेबसाइट Live Law Marathi Mind Communicating Port Comments are reviewed
comment url