livelawmarathi

मनी लाँडरिंग प्रकरणात युनिटेक प्रमोटरची पत्नी प्रीती चंद्रा यांना जामीन मंजूर

मनी लाँडरिंग प्रकरणात युनिटेक प्रमोटरची पत्नी प्रीती चंद्रा यांना जामीन मंजूर
मनी लाँडरिंग प्रकरणात युनिटेक प्रमोटरची पत्नी प्रीती चंद्रा यांना जामीन मंजूर 

दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी दिनांक १४ जून २०२३ रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात युनिटेकचे प्रवर्तक संजय चंद्रा यांची पत्नी प्रीती चंद्रा यांना जामीन मंजूर केला.अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आदेशाला आव्हान देण्यासाठी वेळ मागितल्यानंतर न्यायमूर्ती जसमीत सिंग यांनी सांगितले की, हा आदेश १६ जूनपर्यंत लागू होणार नाही.

“जामीन अर्ज मंजूर आहे. ED तर्फे हजर झालेले मिस्टर (झोहेब) हुसेन सांगतात की, आज जाहीर केलेला आदेश शुक्रवार १६ जून पर्यंत लागू होणार नाही. या विनंतीनुसार, हा आदेश 16 जूनपर्यंत लागू करू नये,” असे न्यायाधीशांनी आदेश दिले.

संजय चंद्रा आणि अजय चंद्रा या मालकांनी बेकायदेशीरपणे 2,000 कोटी रुपये सायप्रस आणि केमन आयलंडमध्ये वळवल्याच्या आरोपावरून ED ने 2018 मध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांखाली युनिटेक समूह आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध सध्याचा खटला नोंदवला होता. प्रीती चंद्राने गेल्या वर्षी कोर्टात जामीन याचिका दाखल केली होती, ती एक फॅशन डिझायनर आहे, जी 4 ऑक्टोबर 2021 पासून कोठडीत आहे आणि तिच्याशी संबंधित ह्या गुन्ह्याची कोणतीही रक्कम नाही. युनिटेक ग्रुप आणि त्याच्या प्रवर्तकांविरुद्ध घर खरेदीदारांनी दाखल केलेल्या अनेक दिल्ली पोलिस आणि सीबीआय च्या एफआयआरमधून मनी लाँड्रिंग प्रकरण उद्भवले. ट्रायल कोर्टात यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. गृहनिर्माण प्रकल्पांसाठी गृहखरेदीदारांकडून गोळा केलेला निधी त्यांच्या हेतूसाठी वापरला गेला नाही आणि खरेदीदारांची फसवणूक झाली आणि आरोपींनी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा केला असा आरोप आहे.

फिर्यादीनुसार प्रीती चंद्राविरुद्धचा आरोप असा आहे की, तिने तिची कंपनी म्हणजेच प्रकौसली इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि. यांनी  एकूण रु.107 कोटी हे पैसे कसे वापरले हे उघड केले नाही.यापूर्वी 7 नोव्हेंबर 2022 रोजी, ट्रायल कोर्टाने "व्यवहारांची प्रचंडता आणि आरोपांचे गांभीर्य" या कारणामुळे तिला जामीन देण्यास नकार दिला होता.

Share this post with your friends

Back Next
No one has commented on this post yet.
Lock after commenting

टॉक लाईव्हलॉ मराठी वेबसाइट Live Law Marathi Mind Communicating Port Comments are reviewed

comment url